Friday 12 October, 2012

काय आहे देशाचे नाव; भारत की इंडिया

http://www.globalmarathi.com/OpenPage.aspx?URL=http://www.esakal.com/esakal/20121011/4727315899656131142.htm


मुख्य पान >> देश >> बातम्या

काय आहे देशाचे नाव; भारत की इंडिया
- वृत्तसंस्था
Thursday, October 11, 2012 AT 04:33 PM (IST)
Tags: india, bharat, name, lakhnau..

लखनऊ - भारताचे नाव भारत आहे की इंडिया असा नेमका प्रश्न विचारुन, येथील
उर्वशी शर्मा यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत केंद्र सरकारला चांगलेच
बुचकळ्यात पाडले आहे. नावाबाबत आपण सर्वांनीच खूप गोंधळ उडविला आहे.
पुढील पिढ्यांमध्ये गोंधळ उडू नये, यासाठी आपण हा प्रश्न विचारला होता,
असे उर्वशी यांनी सांगितले. परंतु त्याच्या या प्रश्नामुळे सरकारी
कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला आहे. कारण सरकारकडे सध्या तरी त्याचे
योग्य असे उत्तर नाही. या प्रश्नाबरोबरच शर्मा यांनी भरीस भर म्हणून
भारताचे नाव भारत किंवा इंडिया कोणी आणि कधी ठेवले, याचे पुरावेही
सरकारकडे मागितले आहेत.

पंतप्रधानांच्या कार्यालयातून त्यांचे निवेदन गृह मंत्रालयाकडे
पाठविण्यात असल्याचे कळविण्यात आले. अपेक्षेप्रमाणे गृह मंत्रालयाकडे या
प्रश्नाचे उत्तर नसल्याने, त्यांनी हे निवेदन संस्कृती खात्याकडे
पाठविले. राष्ट्रीय अभिलेखागारात ३०० वर्षे जुन्या कागदपत्रांचा खजिना
असल्याने, याबाबतचे उत्तर शोधून काढण्यात येत आहे. त्याचा शोध
लागल्यानंतर शर्मा यांना ते पाठविण्यात येईल, असे खात्यातील अधिकाऱ्यांनी
सांगितले.

अभिलेखागारात ही याचिका तीन आठवड्यांपूर्वीच पोचली असून, अद्याप आपल्याला
कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळालेले नाही, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
आपल्याला केवळ भारताचे सरकारी नाव काय आहे, याच प्रश्नाचे उत्तर हवे आहे,
असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय घटनेच्या प्रस्तावनेत 'इंडिया दॅट इज भारत' असा उल्लेख करण्यात
आला आहे. याचा अर्थ आपल्या देशाला दोन नावे आहेत. सरकारी भाषेत
'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया' आणि 'भारत सरकार' असे दोन्हीही उल्लेख करण्यात
येतात. ही देशाची ओळख असल्यामुळे आपण त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे,
असे शर्मा म्हणाल्या. आता त्या सरकारी उत्तराची वाट पाहात आहेत.

No comments:

Post a Comment